किती झाले ?
रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा...
हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन...
पांढर्या गेटपाशी थांबवा...
हां... बास बास... इथेच...
आणि मग उतरत, पर्स काढत विचारते हसत हसत -
हां... किती झाले ?
८४ लक्ष तर झालेच की प्रिये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !
आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चवीने सरु दे अजुन एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त....
-संदीप खरे
Showing posts with label माझ्या आवडत्या मराठी कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या आवडत्या मराठी कविता. Show all posts
Sunday, September 20, 2009
किती झाले.. ?
Thursday, March 19, 2009
"ओळखलत का सर मला" ~ कुसुमाग्रज
"ओळखलत का सर मला" - पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
"गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून"
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझलि होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्या मध्ये पाणी थोड़े ठेवले ;
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे "
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
"गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून"
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझलि होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्या मध्ये पाणी थोड़े ठेवले ;
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे "
खिशाकड़े हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला"
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते "लढ" म्हणा...
~ कुसुमाग्रज - " प्रवासी पक्षी "
Wednesday, January 7, 2009
माझी ओळख आणि पहिला मानाचा मुजरा कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना
मी आनंदयात्री
अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.
कवी - मंगेश पाडगांवकर
अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री
हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.
कवी - मंगेश पाडगांवकर
Subscribe to:
Posts (Atom)
