चोखंदळ वाचकांसाठी टिपण (Notes To Avid Readers)
ह्या मराठी साहित्यिक नोंदस्थळ(Blog) - "आनंदयात्री - एक भटकंती" वर आपल मनापासून स्वागत आहे. (Heartiest welcome on this Marathi blog of literature.)
If you do not know
मराठी(
Marathi), you will surely like one of these blogs dedicated to literature in Hindi,Urdu & Engilsh. Please do visit my writings @ these blogs and let me know your comments and feedback.

Thursday, March 19, 2009

"ओळखलत का सर मला" ~ कुसुमाग्रज

"ओळखलत का सर मला" - पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
"गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून"

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझलि होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्या मध्ये पाणी थोड़े ठेवले ;

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे "

खिशाकड़े हात जाताच हसत हसत उठला

"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला"

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते "लढ" म्हणा...

~ कुसुमाग्रज - " प्रवासी पक्षी "

No comments:

Post a Comment